Breaking News

पर्यावरण बदलांमुळे होणा-या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत,चीनचे चांगले प्रयत्न -संयुक्त राष्ट्र

वॉशिंग्टन, दि. 03 - पर्यावरणात होणार्‍या बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांना सामोरे जाणे आणि त्यातून मढण्यासाठी सुर केलेल्या मोहिमेत भ चीन चांगल्या प्रकारे प्रयत्न करत असल्याचे आज संयुक्त राष्ट्रातील पर्यावरण प्रमुखांनी सांगितले. तसेच पॅरिस करारामधून बाहेर पडणा-या अमेरिकेच्या निर्णयामुळे या जागतिक प्रयत्नांमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत, असेही ते म्हणाले.
जागतिक तापमानात होणा-या बदलांची कारणे वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यासून त्या मुले होणार्‍या परिणामांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हे कोणत्याही एका देशासमोरील समस्या नसून ते जागतिक आव्हान आहे. प्रत्येक देशाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,असे संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण कार्यक्रमाचे कार्यकारी निर्देशक एरिक सोलहीम यांनी म्हटले. जागतिक तापमान बदलाच्या करारातून अमेरिकेने माघार घेतल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यावर त्यांना उत्तर देतांना सोलहीम यांनी स्पष्ट केले होते.