उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या मुस्लिम नेत्यावर गोळीबार
लखनौ, दि. 03 - उत्तर प्रदेशमधील बरेली क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष रईस अहमद यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. अहमद यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोटरसायकलवरून घरी परताना काही अज्ञातांनी काल संध्याकाळी सातच्या दरम्यान अहमद यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधीक्षक खैती गर्ग यांनी सांगितले. देवचरा भागात अहमद यांच्यावर गोळीबार करण्यात आला. भमोरा पोलीस ठाण्याचे अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन अहमद यांना रूग्णालयात दाखल केले. मार्चमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातीघेतल्यानंतर हिल्यादांच जिल्ह्यातील एका राजकारणी नेत्यावर हल्ला झाला आहे. बेरली शहरातील भाजपचे आमदार अरूण कुमार यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणीही केली आहे.