Breaking News

काश्मीरमध्ये जमावाकडून पोलिस उपअधीक्षकाची दगडाने ठेचून हत्या

श्रीनगर, दि. 24 - जम्मू काश्मीरमध्ये जमावाने ड्यूटीवर असलेल्या पोलिस उपअधीक्षकाची हत्या केली. जमावाने पोलिस अधिकार्‍याला विवस्त्र करुन दगडाने ठेचून  खून केला. पोलिस अधिकार्‍याने गोळी झाडल्यानंतर भडकलेल्या जमावाने हे अमानुष कृत्य केलं. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून सुरक्षव्यवस्थेत  वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसर्‍या वक्तीची ओळख पटली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं  पोलिस महासंचालक एसपी वेद यांनी सांगितलं.
नौहट्टा परिसरात डीएसपी मोहम्मद अयूब पंडित जामिया मशिदीबाहेर त्यांची ड्यूटी करत होते. गुरुवारी रात्री उशिरा साडेबारा वारचा काही लोकांनी जामिया  मशिदीजवळ अयूब यांना पाहिलं. मोहम्मद अयूब पंडित मशिदीतून बाहेर येणार्‍या लोकांचे फोटो काढत होते. त्यावेळी लोकांनी अयूब पंडित यांना पकडण्याचा प्रयत्न  केला, तेव्हा त्यांनी आपल्या पिस्तुलमधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. यानंतर भडकलेल्या जमावाने अयूब पंडित यांची दगडाने  ठेचून हत्या केली. त्याआधी जमावाने त्यांना विवस्त्र केलं होतं.