Breaking News

एअर एशियाकडून ‘मिड इयर सेल’ योजना जाहीर

नवी दिल्ली, दि. 24 - एअरएशिया कंपनीकडून मिड-ईयर सेल सादर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या विमानाच्या तिकीटाची सुरूवात आता 3 हजार 999 रुपयांपासून करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास 25 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मात्र ही नोंदणी फक्त 23 नोव्हेंबर 2017 पर्यंतचीच करता येणार असल्याचे कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे सांगण्यात आले आहे. या योजनेनुसार कोची, तिरुचिरापल्ली आणि भुवनेश्‍वर येथील एकमार्गी तिकीट 3 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
एअरएशियाच्या आणखी एका सुविधेनुसार सर्व समावेशक तिकीटाची सुरुवात 1 हजार 499 पासून करण्यात आली आहे. यात (बंगळुरू- कोची आणि बेंगुरू-हैद्राबाद) या एका मांर्गी प्रवासाचा समावेश आहे. यासाठी 25 जूनपर्यंत नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवासावर लागू करण्यात आली आहे.