Breaking News

महाराष्ट्राला ‘अमृत’ योजनेसाठी 47 कोटींचा प्रोत्साहन निधी

नवी दिल्ली, दि. 24 - ‘अमृत’ (अटल नागरी पुनर्निर्माण व परिवर्तन योजनेंतर्गत) आज महाराष्ट्राला 47 कोटींचा प्रोत्साहन निधी प्रदान करण्यात आला. केंद्रीय नगर विकास मंत्री एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते महाराष्ट्र नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा निधी स्वीकारला. विज्ञान भवनात आयोजित ‘शहरी परिवर्तन’ या राष्ट्रीय कार्यशाळेत केंद्रीय नगर विकास तथा शहरी गरीबी निर्मूलन मंत्री एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते अमृत योजनेतंर्गत उत्कृष्ट कार्य करणार्‍या देशातील 16 राज्यांना एकूण 500 कोटी रूपयांची राशी प्रदान करण्यात आली.
‘अमृत’ योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळालेली प्रोत्साहनपर रक्कम ही या योजनेंतर्गत मिळणार्‍या रकमेव्यतिरिक्तची अतिरिक्त रक्कम आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत प्राप्त प्रोत्साहनपर रक्कम ही केवळ अमृत योजनेमधील नवीन प्रकल्प, प्रकल्पांमधील सुधारणा आणि क्षमता विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.