Breaking News

चर्चेनंतरच राजकारणातील प्रवेशाबाबत घोषणा करेन - रजनीकांत

नवी दिल्ली, दि. 24 - राजकारणातील प्रवेशाबाबत राजकीय सहका-यांशी चर्चा करत आहे. याबद्दलची चर्चा पूर्ण होऊन निर्णय घेतल्यावरच राजकारणातील प्रवेशाबाबतची घोषणा करेन, असे अभिनेते रजनीकांत यांनी सांगितले. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी मी काही राजकीय नेत्यांची भेटही घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र या बैठकीबद्दल त्यांनी काहीही माहिती दिली नाही.
मी अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतली. हे वृत्त मी नाकारत नाही. त्यांच्याबरोबर मी चर्चा करत आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक दिवसांपासून रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशबाबत चर्चा चालू आहे.