Breaking News

संसद भवन परिसरात धुम्रपानास बंदी

नवी दिल्ली, दि. 04 - संसद भवन परिसरात धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले  आहे. कर्मचारी व अधिका-यांना निर्देश देण्यात येत आहेत की संसद भवन परिसरात धुम्रपान करू नये. तसे करताना आढळल्आस सक्त कारवाई केली जाईल, असे  त्या पत्रकात म्हटले आहे. संसद भवन परिसरात धुम्रपान केल्याने परिसरात आग लागण्याचा धोका अधिक वाढतो, असेही या पत्रकात म्हटले आहे.
सिगरेट व विडीच्या वाढत्या कच-याला कंटाळून हे पाऊल उचण्यात आल्याचे समजते. सचिवालयाकडून यापूर्वी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांसाठीची  नियमावली जारी करण्यात आली होती. केवळ मंत्री, खासदारांच्याच मुलाखती घेता येतील. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीपुर्वी अपॉईंटमेंट घेतलेली असावी. अपॉईंटमेंट  नसल्यास संसद भवन परिसरात ते दिसल्यावर त्यांची मुलाखत व छायाचित्रे घेता येणार नाहीत, असे त्यात म्हटले होते.