झाडे केवळ चित्रांपुरती राहू नयेत, अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे वृक्षलागवडीचे आवाहन
पुणे, दि. 05 - पेड काटने कुछ लोग आये थे मेरे गांव मे’, धुप बहुत हे कहकर बैठ गए उसकी ही छाव मे’ या शेरोशायरीतून प्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी वृक्षाचे महत्व सांगत, नागरिकांनी जास्त जास्त वृक्षलागवड करावी ती केवळ चित्रांपुरती राहू नये असे मत प्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ व्यक्त केले.
भारतीय रेल्वे, वनविभाग आणि नेचरवॉक यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 वर सलग चारशे मिटर लांबीच्या संरक्षण भिंतीवर प्राणी, पक्षी यांचे चित्र रेखाटण्यात आले आहेत. या चित्रांचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे, प्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखलया उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रेल प्रबंधक बी. के. दादाभोय, मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा, पीसीसीएफ, सोशल फोरेस्टचे अनुराग चौधरी, दिनेश त्यागी, डॉ. इ. भरूचा, सुनिल लिमये तसेच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु आणि राज्याचे वित्त आणि नियोजन व वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रतिक्रिया देत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या.
झाडे ही आपला श्वास आहे. आपल्या लहान मुलांना झाडाचे महत्व पटवून सांगा आणि जास्तीत जास्त झाडे लावा. वाढदिवस, लग्नसमारंभ यादिवशी एक आठवण म्हणून मुलांना झाडे लावण्यास सांगा. तरच ही झाडे जिवंत राहतील. नाहीतर पुढच्या पिढीला झाडे केवळ चित्रांमधून पहावे लागतील आणि ते आपल्या पर्यावरणासाठी धोक्याचे असेल. त्यामुळे झाड आहे तर आपण आहे.’ असे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. सर्वांनी एकत्र राहून चर्चा केल्यास अनेक चांगले उपक्रम घडतात. रेल्वे आणि वनविभागाचा उपक्रम कौतुकास्पद असून, आम्ही घेतलेल्या दत्तक गावांमध्येही असे अभिनव उपक्रम राबवू असे खासदर अनिल शिरोळे यांनी सांगितले.अशाप्रकारचे उपक्रम जंगल राहिले तर प्राणी, पक्षी राहतील आणि हे चित्र काढता येतील. त्यासाठी जंगलांचे सवर्धन होणे काळाची गरज आहे, असे दिनेश त्यागी यांनी सांगितले. पुणे रेल्वे स्टेशनपाठोपाठ दौंड, कोल्हापूर, सोलापूर यासह अन्य ठिकाणीही हे उपक्रम राबवून जनजागृती करता येईल असे सुनिल लिमये यांनी सांगितले. यावेळी अनिल शिरोळे, बी. के. दादाभोय, भूषण गोखले यांनी मनोगत व्यक्त केले.