Breaking News

शिर्डी विमानतळवरून जुलै महिन्यात सुरू होणार प्रवासी विमानसेवा

अहमदनगर, दि. 09 - गेल्या काही काळापासून भाविकांना मोठी प्रतिक्षा असलेल्या शिर्डी येथील विमानतळा वरून प्रवासी विमानांच्या उड्डाणांना जुलै  महिन्यात सुरूवात होण्याची शक्यता आहे. शिर्डी येथील विमानतळाच्या संदर्भात सुरूवातीपासून निर्माण झालेल्या असंख्य अडचणी पार करीत आता विमानतळावरील  बहुतेक सर्व कामे पूर्ण झाली असून विमानतळ आता विमानांच्या उड्डाणासाठी सज्ज झाला आहे.जून महिन्याच्या अखेरीपर्यंत विमान उड्डाणांना हवाई वाहतुक  विभागाकडून आवश्यक असणारी परवानगी मिळाल्यानंतर जुलै महिन्यापासून या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
शिर्डीमध्ये लाखोंच्या संख्येने येणार्या भाविकांच्या सोयीसाठी शिर्डीजवळील काकडी येथे विमानतळ उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.मात्र नागरी हवाई वाहतुक  विभागाकडून विमानांच्या उड्डाणांसाठी आवश्यक असणारी परवानगी न मिळाल्याने प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यात विलंब झाला आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणा  समवेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)च्या अधिका-यांची बैठक झाल्यानंतर येत्या 1-2 आठवड्यात (जून महिना अखेरीस)एमएडीसी ला शिर्डी येथे  विमानसेवा सुरू करणायची परवानगी मिळणे अपेक्षित आहे.त्यानंतर एअर इंडियाच्या सहाय्याने जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात शिर्डी येथून प्रत्यक्ष  प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होणार आहे.