Breaking News

जिल्हा परिषदेतर्फे वारीमार्गावर स्वच्छतेचे नियोजन

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : हागणदारी मुक्तीत आघाडीवर असणार्‍या जिल्हा परिषदेने पालखी मार्गावर नेटके शौचालयांचे नियोजन करुन यावर्षी वेगळा ठसा उमटविला.
24 ते 28 जून या पालखी सोहळ्यादरम्यान सातारा जिल्हा परिषदेने पालखी मार्गावर गावनिहाय नेटके नियोजन केले होते. पाडेगाव, तरडगाव, काळज, सुरवडी, निंभोरे, वडजल, विडणी, पिंप्रद, बरड, राजुरी या ग्रामपंचायतींनी सार्वजनिक शौचालय, शालेय शौचालय आणि अंगणवाडीमधील शौचालय उपलब्ध करुन दिली होती. त्याचबरोबर मुक्कामाच्या ठिकाणी आणि लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये लोणंद, तरडगाव, फलटण व बरडगाव या ठिकाणी 700 मोबाईल शौचालय उभारण्यात आली होती. या शौचालयांचा वापर प्रतिदिन 1 लाख 800 इतका अपेक्षित होता. त्याचबरोबर पाडेगाव ते बरड या पालखी मार्गावरील ग्रामपंचायत व ग्रामपंचायतींमध्ये एकूण 1133 सार्वजनिक शौचालय उपलब्ध करुन देण्यात आली होती. प्रतिदिन 81 हजार 576 इतका अपेक्षित वापर होता.
शासनाच्या अनेक योजनांमध्ये अग्रेसर असणारे सातारा जिल्हा परिषदेने पालखी मार्गावर नेटके शौचालयांचे तसेच स्वच्छतेचे नियोजन करुन यावर्षी वेगळा ठसा निर्माण केला आहे.