Breaking News

1 जुलै कृषी दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती 1 जुलै रोजी दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येते. या कृषी दिनानिमित्त डॉ. जे. के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण कृषी पर्यटन गौरव पुरस्कार वितरण सोहळा तसेच जिल्हा पातळी पीक स्पर्धांतर्गत विजेत्या स्पर्धाकांचा सत्कार समारंभ 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर असणार आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मनोज पवार, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, महिला व बाल विकास समितीचे सभापती वनिता गोरे, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे व जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल यांनी केले आहे.