Breaking News

प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वेम्पती यांची नियुक्ती

नवी दिल्ली, दि. 04 - प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शशी एस.वेम्पंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेम्पती 2014च्या लोकसभा निवडणुकी  दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या डिजीटल कॅपमधील ते महत्वाचे सदस्य होते. प्रसार भारती मंडळामध्ये ते फेब्रुवारी 2016पासून कार्यरत आहेत. तसेच ते इन्फोसिस  या कंपनीमध्येही कार्यरत होते. 2014मध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर नीति डिजीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना करण्यात आले होते.