Breaking News

बदल्यांमधील घोटाळया प्रकरणी ‘सीबीआय’कडून लष्कराच्या तीन अधिका-यांना अटक

नवी दिल्ली, दि. 04 - लष्कर मुख्यालयात नियमबाह्य बदली केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने एका लेफ्टनंट कर्नलसह लष्कराच्या दोन  अधिका-यांना अटक केली. बंगळुरूमधील लष्कराच्या एका अधिका-याची बदली करण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण  विभागाने लेफ्टनंट कर्नल रंगनाथ सुवर्णमणी मोनी आणि गौरव कोहली या दोघांना अटक केल्याचे समजते. मोनी आणि कोहली यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या  विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी विभागाने प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून यात एका ब्रिगेडियरचे नाव आहे. मात्र या ब्रिगेडियरचे नाव आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात  आलेले नाही. केंद्रीय अन्वेषण विभागाने लष्कर विभागातील लेफ्टनंट कर्नल रंगनाथ सुवर्णमणी मोनी, हैदराबाद येथील लष्कराचे अधिकारी पुरूषोत्तम, गौरव कोहली  आणि बंगळुरू येथील अधिकारी एस. सुभाष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.