मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
औरंगाबाद, दि. 07 - मराठवाड्यातील ग्रामीण भागातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठा समाज प्रतिष्ठानने सर्व सोयीयुक्त मराठा विद्यार्थी वसतिगृह तयार केले आहे. आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या वसतिगृहाचा शुभारंभ
करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानसिंह पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्यवर्ती बसस्थानकासमोर कोतवालपुरा येथे हे वसतिगृह उभारले असून, अत्यंत सुसज्ज व सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या वसतिगृहामध्ये मराठवाड्यातील शेतकरी, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील विद्यार्थी आणि आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वसतिगृहाविषयी मानसिंग पवार म्हणाले की, 34 खोल्यांच्या या इमारतीमध्ये सुमारे 150 विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली असून, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी या वसतिगृहाचा उपयोग करता येईल. वसतिगृहाचे मासिक शुल्क प्रत्येकी 1 हजार रुपये असेल. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना हे शुल्क भरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी
मराठा समाज प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून प्रायोजक मिळवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे.