Breaking News

30 लीटर गावठी दारूसह दोघाना अटक

ठाणे, दि. 07 - विनापरवाना गावठी दारूची विक्री करणार्‍या दोघांना डायघर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये एका महिलेचा देखील समावेश  आहे. यावेळी त्याच्याकडून देशी दारू आणि इतर ऐवज जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
डायघर येथील शीळठाकूर पाडा येथील महापे रोड वर जनाबाई श्रीधर पाटील ही महिला आपल्या ताब्यात 15 लिटर गावठी दारू बाळगून विक्री करतांना पोलिसांना  आढळून आली. पोलिसांनी जनाबाई हिस अटक केली असून तिच्याकडील गावठी दारु जप्त केली. तर दुसर्‍या घटनेत नारीवली गाव येथील हनुमान मंदिर जवळ  उघड्या जागेत वासुदेव हेंद्रया पाटील हा गावठी दारू विक्री करतांना आढळून आला. त्याच्याकडून देखील पोलिसांनी 15 लिटर गावठी दारू जप्त करत त्यास अटक  केली. या दोन्ही प्रकरणी डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तापस दय्घर पोलिस करीत आहेत.