अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसाठी शासन सकारात्मक : पंकजा मुंडे
मुंबई, दि. 07 - राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी शासन सकारात्मक विचार करीत असून दोन दिवसांत वित्त विभागाशी बैठक घेऊन मानधन वाढीसाठी निधीच्या तरतूदीविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मंत्री मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांबरोबर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे संचालक कमलाकर फंड यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे रामकृष्ण बी. पाटील, माया परमेश्वर, श्याम म्हात्रे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, सवर्णा तळेकर यांची उपस्थिती होती.
मुंडे म्हणाल्या की, संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. मानधनवाढ जाहीर करण्यापूर्वी वित्त विभागाकडे तरतूद करणे आवश्यक असल्याने विलंब होत आहे. निधीची तरतूद होताच मानधनवाढ जाहीर करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांना प्रकल्पा व्यतिरिक्त कामे स्थानिक पातळीवर दिली जातात. ते कामे कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. स्वच्छ भारत मिशन या उपक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घ्यावा. कारण स्वच्छतेमुळे अंगणवाडी लाभार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटेल आणि बालके आणि त्यांच्या माता हे जागृत झाले तर आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत होणार आहे.
सेविकांना सेवा ज्येष्ठता आणि शिक्षणनुसार मानधनवाढ, निवृत्तीनंतर देण्यात येणारी रक्कम ही केलेल्या सेवा काळावर देण्यात येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच मानधन वेळेत देण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले. भाऊबीज दुप्पट करणे, बँक खात्यावरील किमान शिल्लक रक्कमेतून अंगणवाडी सेविकांना वगळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार तसेच नक्षली भागात काम करणार्या सेविकांना जास्त मानधन, शहरात काम करणार्या सेविकांना शहर भत्ता आदिबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.