पावसामुळे आमचा पराभव टळला : स्टीव्हन स्मिथ
बर्मिंगहॅम, दि. 04 - न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात पावसामुळेच आमचा पराभव टळला, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने व्यक्त केले आहे. न्यूझीलंडच्या 291 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 51 अशी झाली होती. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
त्याबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला की, या सामन्यात आमची कामगिरी समाधानकारक नव्हती. फलंदाजीतही आम्ही थोडेसे कमकुवत ठरत होतो. पाऊस आला त्यावेळी आम्ही न्यूझीलंडसारखे भक्कम स्थितीत असणे पसंत केले असते. पण पावसामुळे आम्ही पराभूत होण्यापासून वाचलो, असे स्मिथ म्हणाला.
आम्ही 3 गडी झटपट गमावले. त्यात न्यूझीलंडचे गोलंदाज वेगवान आणि दर्जेदाज गोलंदाजी करण्यात पटाईत आहेत. त्यामुळे आमच्या विजयाची आशा धुसरच होती. अर्थात 50 पैकी 9 षटकेच झाली असल्याने पुढे सामन्यात काय घडेल हे सांगणे कठीण होते. पण सध्या तरी पावसाने आम्हाला तारले, असे कबूल करायला हरकत नाही, असेही स्मिथने नमूद केले.