भारत-पाक सामन्याद्वारे सचिनचे समालोचन क्षेत्रात पदार्पण
नवी दिल्ली, दि. 04 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याद्वारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर समालोचन श्रेत्रात पदार्पण करणार आहे. 4 जून रोजी हा सामना होणार आहे. सचिन हिंदी भाषेत समालोचन करण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या इंग्रजी समालोचन विभागाने त्याला अद्याप करारबद्ध केलेले नाही. हिंदी भाषेत समालोचन करताना सचिनबरोबर सुनील गावस्कर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि साबा करीम हे अनुभवी समालोचक असणार आहेत. याशिवाय, या सामन्यासाठी पाकिस्तानचेही कीः समालोचक सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत सचिन केवळ या एकाच सामन्यात समालोचन करणार आहे. क्रिकेटमधील समृद्ध कारकीर्द आणि चरित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर सचिनला समालोचकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.