दुखापतीसाठी ‘आयपीएल’ला जबाबादार धरणे चुकीचे : वोक्स
लंडन, दि. 04 - स्नायूंच्या दुखापतीमुळे मला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मात्र या दुखापतीसाठी ‘आयपीएल’ स्पर्धेला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे, असे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याने स्पष्ट केले. वोक्सच्या डाव्या बाजूच्या स्नायूंवर ताण पडल्यामुळे त्याला स्पर्धेतून काल माघार घ्यावी लागली. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात वोक्स दुस-याच षटकानंतर तंबूत परतला व सामना संपेपर्यंत मैदानावर आला नाही. वैद्यकीय तपासणीनंतर दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले आणि वोक्सला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. त्यानंतर ही दुखापत ‘आयपीएल’मध्ये खेळल्याने म्हणजेच अतिक्रिकेटमुळे झाल्याचे बोलले जात होते.
मी आयपीएल स्पर्धा खेळून जेव्हा मायदेशी परतलो, त्यावेळी मी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरूस्त होतो. मी स्पर्धेत चांगल्या गतीने गोलंदाजी केली होती त्यामुळे आगामी आंतरराष्ट्रीय मालिका व स्पर्धांमध्ये मी चांगली कामगिरी करेन, असा मला विश्वास होता. मात्र, काल अचानक माझ्या दुखापतीने उचल खाल्ली आणि मला उर्वरित सामना खेळता आला नाही. आयपीएलमुळे ही दुखापत झालेली नाही, असे स्पष्टीकरण वोक्सने दिले.