Breaking News

शहर पोलिसांतर्फे प्रतिबंधात्मक आदेश जारी

नाशिक, दि. 06 -नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात कायदा व सुव्यवस्था आराखण्यासाठी पोलीस उप आयुक्त विशेष शाखा माधुरी कांगणे यांनी 19 जून 2017  रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 36 अन्वये शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना लेखी व तोंडी आदेश देण्याचे  अधिकार प्रदान केले आहे.
या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावरील जाणार्‍या मिरवणुकीतील व्यक्तिंचे वागणे, बीभत्स व अश्‍लील हावभाव अथवा कृत्याबाबत आदेश  देणे, ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्‍चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी वापरावयाच्या  लाऊड स्पिकरची वेळ,पद्धती, ध्वनीची तीव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे,रत्यावर सार्वजनिक जागेवर गाणी, संगीत ड्रम्स,हॉर्न वाजवणे किंवा कर्कश्श आवाज  करण्यावर नियंत्रण ठेवणे हे आधिकार प्रदान करण्यात आले आहे.आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहील.