Breaking News

टँकर, कारच्या धडकेत तीन ठार तीन जखमी

जालना, दि. 03 - रेवगाव फाट्याजवळ भरधाव डिझेलच्या टँकरने कारला दिलेल्या धडकेत तीन जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. औरंगाबाद येथून नांदेडकडे निघालेल्या डिझेल टँकरने गुरुवारी पहाटे हिंगोलीहून औरंगाबादकडे जाणार्या कारला जोराची  धडक दिली. या धडकेमध्ये कारमधील गुलाबखाँ कासमखाँ पठाण हे जागीच ठार झाले, तर शन्नोपरवीन सलमान पठाण, समीन सलमान पठाण यांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा डिझेल  टँकर कारला धडक देऊन विजेच्या खांबाला जाऊन धडकला. त्यानंतर टँकरचालकासह त्याच्या साथीदाराने तेथून पळ काढला. ही संधी साधून परिसरातील  अनेकांनी मिळेल त्या सहायाने टँकरमधील डिझेल पळविल्याचे स्पष्ट झाले.