ऑक्सिजन सिलेंडरशिवाय एव्हरेस्ट सर करून भारतीय सैनिकांनी रचला विश्वविक्रम
नवी दिल्ली, दि. 04 - भारतीय लष्कराच्या चार सैनिकांनी ऑक्सिजन सिलेंडरशिवाय जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर पोहोचून तिरंगा फडकवला. यामुळे एक विश्वविक्रम झाला असून लष्कराचे चार सैनिकांचा हा जगातील पहिला गट बनला आहे.
कंचोक टेंडा, केल्शांग दोर्जी भूटिया, कलडेन पानजूर व सोनम फुनसोक चारही गिर्यारोहकांची नावे आहेत. लष्करातील एकूण 14 जवानांनी एव्हरेस्टवर चढाई सुरू केली. त्यात उर्गयेन टोपगे, वैंग बेली, कर्मा जोपा यांनी ऑक्सिजन सिलेंडरच्या सहाय्याने चढाई पूर्ण केली. आमच्या गटातील 10 सदस्यांनी ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्नो लियोन एव्हरेस्ट एक्सपैडिशन 2017 चे प्रमुख कर्नल विशाल दुबे यांनी सांगितले.
त्यातील चार जण ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी झाले. अतिरिक्त ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्टवर पोचणारा पोचणारा हा पहिलाच गट आहे. ऑक्सिजनशिवाय जगातील सर्वांत उंच शिखरावर पोहोचून इतिहास घडवण्याचे आमचे लक्ष्य होते. त्यात आम्ही यशस्वी झालो, असेही कर्नल दुबे यांनी सांगितले. आतापर्यंत ऑक्सिजनशिवाय 8 हजार 848 मीटर उंच एव्हरेस्ट चढण्याचा चार हजार जणांनी प्रयत्न केला आहे. त्यात 187 जण यशस्वी झाले. तर गटासह जाणा-या 6 शेर्पा गाईडही ऑक्सिजनशिवाय शिखरावर पोहोचले आहेत.