Breaking News

’सीबीएससी ’ च्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली, दि. 04 - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या पाच विभागांचा निकाल आज दुपारी बारा वाजता जाहीर  झाला. या पाच विभागांमध्ये दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, त्रिवेंद्रम आणि देहरादून यांचा समावेश आहे. यंदाच्या निकालात 6 टक्क्यांची घसरण झाली असल्याचे  सांगण्यात येत आहे.
सर्वात चांगला निकाल त्रिवेंद्रम विभागाचा निकाल 99.85 टक्के, चेन्नई विभागाचा 99.62 टक्के, अलाहाबाद विभागाचा 98.85 टक्के तर दिल्ली विभागाचा निकाल  78.09 टक्के इतका लागला आहे. सर्वात चांगला निकाल त्रिवेंद्रमचा लागला असून सर्वात कमी निकाल दिल्ली विभागाचा लागला आहे. मागील वर्षी दिल्ली विभागाचा  निकाल 91.76 टक्के लागला होता. मात्र यंदा निकालात घसरण झाली असल्याचे दिसून येत आहे.
हा निकाल  www.cbseresults.nic.in , www.cbse.nic.in , .results.nic.in या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल  कशाप्रकारे पाहावेत, याची सविस्तर माहिती सीबीएसईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच 52001 (एमटीएल), 57766 (बीएसएनएल), 5800002  (एअरसेल), 55456068 (आयडिया), 54321, 51321 आणि 5333300 (टाटा टेली सर्व्हिस) आणि 54321202 (एअरटेल) या क्रमांकावर संदेशाद्वारे  निकाल उपलब्ध होणार आहे.