राजशिष्टाचार बाजूला ठेवत राजनाथ सिंग यांनी घेतली जवानाची गळाभेट
नवी दिल्ली, दि. 03 - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत आज एका जवानाची गळाभेट घेत त्याच्या साहसाचे कौतुक केले. गोधराज मीना असे या जवानाचे नाव आहे. गोधराज हा जवान काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना जखमी झाला होता. त्यामुळे त्याला अपंगत्व आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कार्यक्रमात राजनाथ सिंग यांनी शौर्य पदक देऊन गोधराज याचा सन्मान केला.
दहशतवाद्यांकडून 2014 साली करण्यात आलेल्या हल्ल्यात गोधराज यांना गोळ्या लागल्या होत्या. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना अपंगत्व आले. शौर्य पदक दिल्यानंतर गोधराज यांचे 85 टक्के शरीराची हालचाल होत नसूनही त्यांनी सलामी देण्याचा प्रयत्न केला. हे पाहून प्रभावित झालेल्या राजनाथ सिंग यांनी राजशिष्टाचार तोडत त्यांची गळाभेट घेतली. राजशिष्टाचारानुसार पदक मिळाल्यानंतर सन्मान करणा-या व्यक्तीसोबत हस्तांदोलन करायचे असते.