Breaking News

‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी बैठक

नवी दिल्ली, दि. 03 - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत दिल्ली आणि पंजाब विधानसभा निवडणुकांमधील चुकांबाबत विचारमंथन करण्यात येणार असून गुजरातमधील निवडणुकीसाठी नवा प्रचार आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाच महिन्यांपूर्वीच ‘आप’ने गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण मधल्या काळात पाच राज्यांच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने आता गुजरात निवडणुकीसाठी आराखडा कसा असावा आणि प्रचार कसा केला जावा, यासाठी ‘आप’ची बैठक महत्वाची ठरणार आहे. दिल्ली महापालिका निकालानंतर प्रथमच अशाप्रकारची बैठक होत असून या साठी ‘आप’चे सुमारे 24 वरिष्ठ नेते हजर राहणार आहेत.