मतदान यंत्रांच्या प्रात्यक्षिकात आज दोनच पक्ष होणार सहभागी
नवी दिल्ली, दि. 03 - मतदान यंत्रात फेरफार होत नाहीत हे दाखवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पंजाब, उत्तराखंड व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत वापरण्यात आलेली 14 मतदान यंत्रे वेगळी काढली आहेत. या मतदान यंत्रात फेरफार करून दाखवण्याचे खुले आव्हान आयोगाने दिले असून शनिवारी याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे.
देशात सात राष्ट्रीय व 65 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष असून त्यापैकी केवळ दोनच पक्षांनी मतदान यंत्रांत फेरफार करून दाखवण्याचे आव्हान स्विकारले आहे. शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोगाच्या मुख्यालयात याचे प्रात्यक्षिक होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोन पक्षांनीच मतदान यंत्रात फेरफार करण्याचे आव्हान स्विकारले आहे. या व्यतिरिक्त भाजप, राष्ट्रीय लोक दल, भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांनी केवळ निरीक्षण करण्यासाठी उपस्थित रहाणार असल्याचे आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले. आयोगाने दिलेल्या मुदतीनंतर अर्ज केल्याने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा अर्ज बाद करण्यात आला.