Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपन : प्रणीतला नमवून श्रीकांत उपांत्य फेरीत

सिडनी, दि. 24 - ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज दोन भारतीयांच्या सामन्यात किदम्बी श्रीकांतने साई प्रणीतला 25-23, 21-15 असे सरळ गेममध्ये पराभूत केले. नुकतेच इंडोनेशिया ओपनचे विजेतेपदक पटकावल्यामुळे श्रीकांत या सामन्यात वरचढ ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार श्रीकांतने सामन्याच्या सुरूवातीपासून सफाईदार खेळ सुरू केला. प्रणीतनेदेखील झटपट हार न मानता पहिला गेम 23 गुणांमपर्यंत खेचला. पण अखेर श्रीकांतने पहिला गेम जिंकला. दुस-या गेममध्येही दोघांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली.