Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपन : सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात

सिडनी, दि. 24 - ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत सहाव्या मानांकित चीनच्या सून यू हिने सायनावर 21-17, 10-21, 21-17 असा विजय मिळवला. या सामन्यातील पहिला अटीतटीचा झाला. तो गेम सून यू ने जिंकला. दुसरा गेम मात्र अगदी सहजपणे सायनाने जिंकला आणि सामन्यात बरोबरी साधली. तिसरा गेमही चांगलाच रंगला. पण 1 तास 18 मिनिटे चाललेल्या या खेळात सून यूने बाजी मारली.