Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपन : अग्रमानांकित यिंगने केले सिंधूचे ‘पॅक-अप’

सिडनी, दि. 24 - ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित तैपेईच्या तै त्झु यिंग हिने सिंधूवर 10-21, 22-20, 21-16 असा विजय मिळवला. एक गेम पॉईंट गमावणे सिंधूला फार महागात पडले. पहिला गेम सिंधूने मोठ्या फरकाने सहजतेने जिंकला. दुसरा गेमदेखील सिंधूने जवळजवळ जिंकलाच होता, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी सिंधूने गेम पॉईंट गमावला व दुसरा गेमही गमावला. त्यानंतर पुढच्या गेममध्ये मात्र सिंधूला पुनरागमन करता आले नाही. या पराभवामुळे सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.