Breaking News

गजानन महाराजांची पालखी पंढरीकडे रवाना!

अकोला दि. 02 - सारं अकोला शहर बुधवारी ‘गण गणात बोते’च्या गजरात न्हावून निघालं. निमित्त होतं गजानन महाराजांच्या पालखीचं अकोला शहरात झालेल्या  आगमनाचं. बुधवारी रात्री भौरद गावात मुक्काम केल्यानंतर काल (गुरुवार) सकाळी डाबकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचे अकोल्यात आगमन झालं आहे. अकोलेकरांनी  मोठ्या  उत्साह आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं.
गजानन महाराजांची पालखी आज आणि अकोल्यात मुक्काम करणार आहे. शनिवारी  पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे. 31 मेला शेगावातून  निघालेली गजानन महाराजांच्या  पालखीचे  नागझरी, पारस आणि भौरदमार्गे आज सकाळी अकोल्यात आगमन झालं. शहरातील डाबकी रोडवर गजानन महाराज  स्वागत समितीच्या वतीने महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आलं. गजानन महाराजांच्या पालखीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.  विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच  यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. विठू नामाचा जयघोष करत 31 मे रोजी गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली.
या पालखीमध्ये तीनशे टाळकरी, 250 पताकाधारी, 150 सेवाधारी, गायक वादक, अश्‍व, हत्ती सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे विठूरायांच्या भेटीसाठी सगळ्यात  आधी निघणारी ही पालखी आहे. या पालखीचा प्रवास तब्बल दोन महिने चालतो. पालखीमध्ये साधारण 600 ते 650 वारकरी दाखल झाले आहेत.