Breaking News

स्थायी समिती सभापतीपदी गजानन बारवाल

औरंगाबाद, दि. 04 - येथील महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शहर विकास आघाडीचे नेते व माजी महापौर गजानन बारवाल यांची निवड करण्यात  आली आहे. बारवाल समर्थकांनी त्यांच्या निवडीनंतर एकच जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले. महापालिकेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि शहरविकास  आघाडी यांची सत्ता आहे. गजानन बारवाल हे एकेकाळी शिवसेनेकडून महापौर होते. स्थायी समिती सभापतीपदासाठी त्यांचा एकच अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध  विजयी घोषित करण्यात आले. महिला बालकल्याण सभापतीपदी आशा नरेश भालेराव तर उपसभापती पदी ज्योती सुनील नाडे यांना विजयी घोषित करण्यात आले.