राज्यात रेल्वेची 1 लाख कोटींपेक्षा जास्त विकास कामे - मुख्यमंत्री
बीड, दि. 04 - केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्रात रेल्वेची 1 लाख कोटी पेक्षा जास्त निधीची कामे सुरु असून इतिहासात राज्याला रेल्वेने इतका निधी प्रथमच दिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांचे याबद्दल आभार मानले.
दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेच्यावतीने परळी वैजनाथ, जि. बीड येथील रेल्वे स्थानक परिसरात आयोजित कार्यक्रमात परळी ते बीड या नवीन रेल्वेमार्गाचा शुभारंभ आणि परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर सुधारित प्रवासी सुविधांचा उदघाटन सोहळा तसेच सोलापूर आणि अहमदनगर रेल्वे स्थानकाच्या व विभागातील विविध रेल्वे प्रकल्पाचे रिमोट व्हिडीओ लिंकद्वारे उदघाटन व लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रावसाहेब दानवे, आमदार विनायक मेटे, नारायण कुचे, आमदार आर.टी. देशमुख नगराध्यक्षा सरोजिनी हालगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेल्वेच्या विविध विकास कामांना राज्य शासन केंद्राबरोबरच प्राधान्य देत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, रेल्वेने राज्यात गेल्या दोन वर्षात 28 नवीन रेल्वेगाड्या दिल्या आहेत. राज्याला 208 पट जादा निधी देवून रेल्वेने इतिहास घडविला आहे. परळी- अहमदनगर नवीन रेल्वेमार्गाचे कै. गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न ख-या अर्थाने पूर्ण होण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या सरकारने पुढाकार घेतला आहे. ज्या विकासासाठी कै. मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्याला मूर्त स्वरुप देण्याचे काम रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हातून होत आहे. परळी ते बीड या रेल्वेमार्गाच्या कामाचाही शुभारंभ होत असल्याने आता हा रेल्वेमार्ग 2019 पर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी राज्य सरकार आपल्या वाट्यातील निधी प्राधान्याने देईल. केंद्र सरकारही निधी कमी पडू देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील रेल्वेच्या कामांना राज्य शासन सदैव सहकार्य करले अशी ग्वाही दिली.
राज्य शासनाने भूसंपादनाचे नवीन धोरण राबविले असून विकास कामांसाठी जमिनी देणा-या शेतक-यांना चारपट मोबदला दिला जात आहे. यामुळे गतीने भूसंपादनाची कामे पूर्ण करुन रेल्वेला मदत केली जात आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करीत राहील अशी ग्वाही दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या विविध प्रकल्पासाठी राज्य शासन हातात हात घेऊन काम केल्याने अनेक प्रकल्प मार्गी लागत असल्याचे सांगून मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.