शेतकर्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी कडून जिल्हाधिकार्यांना निवेदन
नाशिक, दि. 04 - कर्जमाफी तसेच शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी बांधव संपावर गेले आहेत. या संपावर गेलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनात फुट पाडण्यासाठी आंदोलकांवर खोटे गुन्हे दखल करण्यात येत आहेत. शेतकर्यांवर दाखल केलेले दरोडा व अन्य गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यात आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्येकडे वळत आहे. त्यामुळे तातडीने शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून नव्याने पतपुरवठा उपलब्ध करून द्यावा . शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा. शेतकर्यांच्या शेतपंपाची वीज बिले माफ करावीत. तसेच ग्रामीण भागातील विजेचे लोडशेडींग तातडीने रद्द करावे आदी मागण्यादेखील जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.
कविता राऊत यांच्या सारख्या आंतरराष्ट्रीय धावपटू निर्माण करण्यार्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे क्रीडा संकुल उभारण्यात यावे त्यासाठी अंजनेरी येथे ट्रॅकिंग सेंटरच्या उर्वरित 4 एकर जागा शिल्लक असल्याने त्यामध्ये नवीन आराखडा तयार करून क्रीडा संकुल उभारण्यात यावे अशी मागणी देखील यावेळ केली.
शेतकरी संपाला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई नाक्यावरील राष्ट्रवादी भवन पासून सुमारे 500 युवकांनी दुचाकीवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, आमदार जयवंत जाधव, हिरामण खोसकर, अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, दिपक वाघ, कैलास मोरे, बाळासाहेब म्हस्के, ज्ञानेश्वर तिदमे, अर्जुन खांडबहाले, ढवळू फसाळे, बाळासाहेब बोडके, पहिलवान बाळू बोडके, शांताराम झोले, माणिक कडलग, सागर ठाकरे, सागर बोडके, महेश गांगुर्डे, गौरव खांडबहाले, संतोष पवार, भारत पालवे, तानाजी महाले, नितीन महाले, रतीश टर्ले, पप्पू खोतकर, रंगनाथ खोटरे, धनंजय टोपले, केशव महाले, संदीप बोडके, रंगनाथ किलबिले, करण उगले, काळू भडांगे, अंकुश भस्मे, बाळा लोंढे, अमित मोरे, गणेश मोरे, सचिन बोडके, राहुल जाधव आदी उपस्थित होते.