Breaking News

राफेल नदालने पटकावले फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

पॅरिस, दि. 12 - स्पेनच्या राफेल नदालने स्वीत्झर्लंडच्या वावरिंकाचा 6-2, 6-3, 6-1 असा पराभव करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. राफेल नदालने दहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. नदालचे हे कारकीर्दीतील 15 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. केले कोर्टचा बादशहा अशी ओळ असलेल्या नदालने अंतिम सामन्यात प्रारंभापासूनच आत्मविश्‍वासपूर्वक खेळ करत वावरिंकाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.