Breaking News

कपिल मिश्रा यांचे कुमार विश्‍वास यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन

नवी दिल्ली, दि. 12 - आम आदमी पक्षातून हकालपट्टी केलेले माजी मंत्री कपिल मिश्रा हे आपचे ज्येष्ठ नेता कुमार विश्‍वास यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. मात्र विश्‍वास घरी नसल्यामुळे कपिल मिश्रा यांनी त्यांच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. तसेच जोपर्यंत विश्‍वास यांची भेट होत नाही तोपर्यंत येथेच बसून राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मिश्रा यांनी विश्‍वास यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या दरवाजावर आपल्या मागण्याचे पत्रक चिटकवले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी पक्षातील घोटाळ्याबद्दल माहिती असलेल्या नेत्यांना आणि आमदारांना काही प्रश्‍न विचारले आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या उपोषणावेळी ज्या 10 केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ती मागणी केवळ सत्ता मिळविण्यासाठी केली होती का ?असा सवालही मिश्रा यांनी पक्षातील नेते आणि आमदारांना केला. यासारखे अनेक प्रश्‍न कपिल यांनी विश्‍वास यांना विचारले असून ते उत्तराची प्रतिक्षा करत आहेत.
कपिल शर्मा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. केडरीवाल यांनी पैसे घेतल्यानंतर बनावट कंपन्यांच्या नावे हवालाच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला. तसेच 400 कोटी रुपयांच्याटँकर घोटाळ्यामध्येदेखील केजरीवाल आणि त्यांच्या दोन निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता.