Breaking News

ऑस्ट्रेलियात कोळसा खाण प्रकल्पात गुंतवणुकीस अदानी समुहाला अखेर मंजुरी

नवी दिल्ली, दि. 07 - अदानी समूहाला ऑस्ट्रेलियामध्ये 21.7 अब्ज डॉलरच्या वादग्रस्त कोळसा खाण प्रकल्पात गुंतवणूक करण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली. पर्यावरणाशी संबंधित काही समस्यांमुळे या प्रकल्पासमोर काही अडचणी होत्या.
या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्याच्या निर्णयाची घोषणा करतामा मला खूप अभिमान वाटत आहे. ऑस्ट्रेलियात सद्यस्थितीत सर्वांत मोठी एकमेव पायाभूत सुविधा व रोजगारक्षम विकास प्रकल्पांपैकी एका प्रकल्पाला सुरुवात झाली, असे गौतम अदानी म्हणाले. ऑस्ट्रेलियात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा हा एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण ऑस्ट्रेलियात भारतीय कंपनीची ही पहिली सर्वांत मोठी गुंतवणूक आहे आणि याकडे गुंतवणूक व व्यापाराच्या दृष्टीने अन्य कंपन्यांनीही अनुकरण करावे, असे अदानी म्हणाले. अदानी यांच्या या प्रकल्पामुळे ऑस्ट्रेलियातील सक्का स्किंक (छोटी पाल) व सर्प प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियन ग्रीन्स पार्टीचा विरोध होता.