आखाती देशांतील तणाव : लाखो भारतीय नागरिक अडचणीत
नवी दिल्ली, दि. 07 - सौदी अरेबिया, बहरीन, यमन, इजिप्त, लिबिया, मालदीव व संयुक्त अबर अमिरात या देशांनी कतारशी संबंध तोडले आहेत. त्याचा परिणाम आखाती देशांतील 48 लाख व कतारमध्ये रहाणा-या साडे सहा लाख भारतीय नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कतारचे अल-कायदा व इसिस या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कतारशी आखाती देशांनी सर्व प्रकारचे संबंध तोडून तेथील अधिका-यांना मायदेशी परत बोलावले आहे. लोकांच्या येण्या-जाण्यावरही बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमाही सील केल्या जात आहेत. या देशांतील वाढता तणाव ही त्यांची अंतर्गत बाब असल्याने भारताने म्हटले आहे. मात्र या घडामोडींचा परिणाम भारतावर अप्रत्यक्षरित्या पडणार आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सौदी अरेबियाकडून भारतात सर्वाधिक खनिज तेल आयात केले जाते. तर कतरमधून सर्वाधिक नैसर्गिक वायू घेतला जातो. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा संपूर्ण भाग महत्त्वाचा मानला जातो. आखाती देशांत सर्वाधिक 48 लाख 20 हजार, संयुक्त अरब अमिरातीत 25 लाख, तर सौदी अरेबियात 30 लाख भारतीय कामगार काम करतात. कतरमध्ये 6 लाख 30 हजारहून अधिक भारतीय नागरिक आहेत. आखाती देशांतील तणावाचा परिणाम तेथील कामावरही पडू शकतो.