अमेरिकेतील ऑरलँडो शहरात गोळीबार, पाच जणांचा मृत्यू
ऑरलँडो, दि. 06 - अमेरिकेतील ऑरलँडो या शहरातील बिझनेस पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणार्या हल्लेखोराचा पोलिसांनी खात्मा केला असून कामासंदर्भातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.
या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाही, अशी माहिती ऑरलँडो पोलीसांनी दिली आहे. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक रहिवाशांनी घाबरु नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. गोळीबारामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.