शेतकर्यांच्या नावावर आंदोलनं करणार्यांशी चर्चा नाही : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 06 - शेतकर्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणारे आणि शेतकर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणार्यांशी आम्ही चर्चा करणार नाही. खर्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला आम्ही आजही तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शेतकरी हिताचे निर्णय घेऊनही शेतकर्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजवली जात आहे. शेतकर्यांनी गेल्या सरकारचे 15 वर्ष पाहिले आहेत, आणि या सरकारचे अडीच वर्ष पाहिले आहेत. शेतकर्यांना सर्व परिस्थितीची जाणीव आहे. शेतकरीच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. दरम्यान पुणतांबा येथील शेतकरी समितीने नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत शेतकर्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर या समितीने संप मागे घेण्याची घोषणा केली. मात्र समितीच्या या निर्णयानंतर शेतकरी आंदोलनात फूट पडली आणि या समितीचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत संप सुरुच ठेवला. शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस आहे.