Breaking News

शेर बहादूर देउबा यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड

काठमांडू, दि. 07 - नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांची आज नेपाळच्या पंतप्रधानपदी बहुमताने निवड करण्यात आली. नेपाळच्या संसदेत देऊबा यांना 388 मते मिळाली. 388 विरूद्ध 170 अशा फरकाने त्यांनी ही निवडणूक जिंकली. 593 सदस्य असलेल्या सभागृहात देऊबा यांना बहुमतासाठी 297 मते आवश्यक होती. देउबा हे चौथ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत.
मावळते पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी मागील महिन्यात नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देऊबा पंतप्रधान होतील हे जवळपास निश्‍चित होते. त्यानुसार आज नेपाळच्या संसदेत पंतप्रधानपदासाठी मतदान झाले. या पूर्वी देऊबा 1995 ते 1997, 2001 ते 2002 आणि 2004 ते 2005 या कालावधीत नेपाळचे पंतप्रधान होते.