Breaking News

जेईई’ चा निकाल जाहीर, सर्वेश मेहतानी देशात पहिला

नवी दिल्ली, दि. 12 - केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरिता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-याम्हणजेच सामाईक प्रवेश परीक्षा (अ‍ॅडव्हान्स)चा निकाल रविवारी जाहीर झाला असून त्यात पंचकुलाचा सर्वेश मेहतानी देशात पहिला आला आहे. त्याला 366 पैकी 339 गूण मिळाले आहेत. याशिवाय राजस्थानचा सूरज देशात पाचवा आला आहे. त्याला 366 पैकी 330 गूण मिळाले आहे.
क्षशशरर्वीं.रल.ळप या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. देशभरातून 1 लाख 70 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. देशातील 23 आयआयटीमधील सुमारे 11 हजार जागांसाठी ही परीक्षा पार पडली असून जेईई मेन्समध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरतात. जेईई अ‍ॅडव्हान्समधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची आयआयटी आणि धनबाद येथील माइन संस्थेसाठी निवड होते. सात टप्प्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रीया पार पडते.