मुस्लिमांच्या देशभक्तीबद्दल संशय घेणे बंद करा - नसरुद्दीन शाह
नवी दिल्ली, दि. 03 - देशात कोणालाही मुस्लीमांच्या भारतीयत्वावर संशय घेण्याचा अधिकार दिला जाऊ नये. आज देशात शांततेचे आवाहन करणा-यांना देशद्रोही म्हटले जात आहे, असे मत अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले.
मुस्लीमांचा पाकिस्तानकडे ओढा असतो हे अमान्य करता येण्यासारखे नाही. पण त्यापेक्षाही मुस्लीमांना भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि देशप्रेमाबाबत संशय घेतल्यास ज्यांना वाईट वाटते अशा मुस्लीमांचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. भारतीय मुस्लीमांनी आता पीडित मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. यातून सर्वांना एकाच दृष्टीकोनातून पाहिले जाते. आम्हाला त्रास दिला जात आहे असे समजणे बंद केले पाहिजे. कोणीतरी अवतार घेईल अशा भ्रमात राहू नये. ही समस्या सोडवण्यासाठी स्वत:च प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून कुणीही आपल्या भारतीयत्वावर प्रश्नचिन्ह उभे करेल आणि या देशावर आपला अधिकार कमी आहे असे कुणाला सांगायला नको, असेही शाह म्हणाले.