Breaking News

स्टारफिशच्या तीन जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

ठाणे, दि. 04 - महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेअंतर्गत बालेवाडी, पुणे येथे नुकत्याच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिशच्या  जलतरणपटूंनी विशेष कामगिरी करुन राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात स्थान पटकाविले आहे. सवर आकुस्कर, यश सोनक, ऋग्वेद पाटील या जलतरणपटूंची  निवड राष्ट्रीय स्पर्धेकरिता झाली आहे.
बालेवडी पुणे झालेल्या जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या सवर आकुस्क्र (सिंघानिया स्कूल, ठाणे) हिने 1 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य, तसेच वैयक्तिक विजेतेपद  पटकाविले आहे. यश सोनक (लोकपुरम हायस्कूल) याने 1 रौप्य, 1 कांस्यपदक पटकाविले आहे. तर ऋग्वेद पाटील (रोहा) याने 1 रौप्यपदक पटकाविले आहे. हे  तीनही जलतरणपटू राष्ट्रीय स्पर्धेसाठी ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव  करीत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.