आडगाव येथे दुधाचे टँकर केले पंक्चर
जळगाव, दि. 04 - मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे शेतकरी संपाचे पडसाद उमटत असून दि.2 रोजी आडगाव येथे दुधाचे टँकर पंक्चर करण्यात आले, तर पिलखोड येथे रास्ता रोको करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे चाळीसगावहून मालेगावमार्गे मुंबईला जाणारा दुधाचा टँकर आडगाव येथील संतप्त शेतकर्यांनी अडवून पंक्चर केला. यावेळी रावसाहेब तोताराम पाटील, सचिन पाटील, संभाजी पाटील, धोंडीराम पाटील, संजय पाटील, सतीश पाटील, जगदीश पाटील यांच्यासह गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. तर
पिलखोड येथील शेतकर्यांनी दि.2 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चाळीसगाव मालेगाव राज्यमार्गावरील वाहतूक अडवून रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात नीळकंठ मगर, अमोल पाटील, सचिन पाटील, तुषार पाटील, विकास मगर यांच्यासह असंख्य शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्यासह कर्मचार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.