डॉ.पवारांपासून प्रेरणा घ्यावी : कुलगुरू
औरंगाबाद, दि. 03 - विद्यापीठाच्या रसायनशास्त्र व जीवरसायनशास्त्र विभागाच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत मुलभूत कार्य डॉ.एस.एस.पवार यांनी केले आहे. विद्यापीठाबद्दल व मराठवाडयाबद्दल त्यांना प्रचंड आस्था आहे. डॉ.पवार फाऊंडेशने दिलेला निधी गुणवतांस सुर्वणपदकाच्या रुपाने देण्यात येईल. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिक्षण, संशोधनाबद्दल अन्य शिक्षणप्रेमी मंडळीनी योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी केले आहे.विद्यापीठामुळेच नावलौकीक मिळाला : डॉ.पवार पन्नास वर्षापुर्वी तत्कालीन कुलगुरु डॉ.एन.आर.तावडे यांच्या कार्यकाळात रसायनशास्त्र विभागात मी रुजू झालो. याच विद्यापीठाने नावलौकीक मिळवून दिला. 25 विद्यार्थ्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी मिळविली. आज मी पुण्यात जरी स्थानिक झाालेला असलो तरी मराठवाडा विद्यापीठाशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे गुणवतांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याच्या दृष्टीने हा निधी विद्यापीठाला दिला आहे, अशी प्रतिक्रिया डॉ.एस.एस.पवार यांनी व्यक्त केली.
