Breaking News

अग्रोळी गावातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधांसाठी 2 कोटी 47 लाख खर्च करणार

नवी मुंबई, दि. 03 - अग्रोळी गावातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधांसाठी 2 कोटी 47 लाख खर्च करणार आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव काल स्थायी  समितीने मंजूर केला आहे. बेलापूर विभागातील अग्रोळी गाव सेक्टर 30 गावठाण विस्तार योजने अंतर्गत रस्ते, गटर यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.  सध्या मनपातर्फे अग्रोळी गावात पाणी पुरवठा व मल:निस्सारण व्यवस्था करण्यात आली आहे. यातील मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.  त्यामुळे या ठिकाणी रस्ते,गटर व पदपथ असून नसल्या सारखे आहेत. या पायाभूत सुविधां अभावी येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पाणी  पुरवठा व मल:निस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम झाल्यावर दुसर्या टप्प्यात येथील रस्ते व गटारांचे काम करण्यात येणार आहे. गावठाण विस्तार योजने अंतर्गत  महापालिकेने विकासशुल्क येथील नागरिकांकडून घेतले आहे. या कारणास्तव सदर भागात पायाभूत सुविधा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये रस्ते,  पदपथ, गटारे, युटीलीटी डक्ट बांधणे, गॅबियन वॉल बांधणे आदी कामे करण्यात येणार आहे. अंदाजपत्रकीय दरानुसार 3 कोटी 10 लाखांच्या खर्चाचे काम होते;  मात्र निविदा काढल्यावर 4 कंत्राटदारांनी निविदा भरल्या. त्यामध्ये डेव्हलप.प्रा.ली. कंपनीने सर्वात कमी दर भरले. इतर कंत्राटदारांपेक्षा व अंदाजपत्रकिय दरापेक्षा  1.20 टक्के कमी दराने निविदा भरली होती. सदरचा प्रस्ताव शहर अभियंता विभागाने आयुक्तांमार्फत स्थायी समितीत मंजुरीसाठी पाठविला होता. सदस्यांनी सदरचा  प्रस्ताव मंजूर करून पावसाळातोंडावर असल्याने तातडीने हे काम करण्यात यावे अशी सूचना केली. तसेच यासाठी लवकरात लवकर ठेकेदाराला कार्यादेश देण्यासाठी  सदरचा प्रस्ताव मंजूर केल्यावर लगेचच त्याचे इतिवृत्तांतही कायम करवून घेतले.