जास्त गुणांमुळे वादात अडकलेल्या गणेश कुमारला अटक
पाटणा, दि. 04 - बिहारमधील 12 वीच्या परिक्षेत संगीत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याप्रकरणी वादात अडकलेल्या गणेश कुमारला अटक करण्यात आली. तसेच आज बिहार शालेय परिक्षामंडळाने गणेश कुमारचा लागलेला निकाल रद्द ठरविला आहे.
निकाल रद्द केल्यानंतर त्या अटक करुन त्याच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान गणेश कुमारला संगीत विषयातील काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची अचूक उत्तर देता न आल्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे. सुदूरवर्ती एका माध्यमिक शाळेत शिक्षण घेणा-या गणेशला 12 वी च्या परिक्षेमध्ये 82.6 टक्के मिळाले यापैकी त्याला संगीत विषयात 82 गुण मिळाले. मात्र त्याला संगीत विषयातील प्राथमिक ज्ञान ही नाही असे दिसले आहे.