Breaking News

त्र्यंबकेश्‍वर येथे दोन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा तलवात बुडून मृत्यु

नाशिक, दि. 27 - त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात काल दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकहून सहलीसाठी गेलेल्या दोन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या विद्यार्थ्यांची संग्राम शिरसाठ (वय 24, रा. गंगापूररोड, नाशिक) व कौस्तुभ भिंगारदिवे (वय 26, राहुरी ता. राहता जि. नगर) अशी नावे आहेत. नाशिकमधील एका महाविद्यालयात हे विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, पावसाळ्यात त्र्यंबक परिसरात सहलीच्या निमित्ताने हे विद्यार्थी आले होते. पोहण्यासाठी येथील केटी बंधा-यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्नात दोघेही डोहात बुडाले.
सहलीसाठी साधरणता 5 ते 6 युवकांचा ग्रुप आला होता. पहिणे फाटा त्रिफुलीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या वळणात वाहने उभी करून नदीपात्रात हे विद्यार्थी पोहण्यासाठी डोहात उतरले असता त्यापैकी एक बुडायला लागला. त्यानंतर दुसरा त्याला वाचवायला गेला व तो देखील बुडाला.आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवाशी धावून आले. खडकवाडी येथील तरूणांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलीस पाटील अंबापुरे यांनी वाडीव-हे पोलीस ठाण्यास खबर दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले व पंचनामा करण्यात आला. ञ्यंबक शहरापासून अवघ्या 9 किमी अंतरावर हि घटना घडली आहे. दरवर्षी पावसाळयात येथे सहलींसाठी मोठी गर्दी होते.