Breaking News

दिल्लीतील ओखला भागात सिलेंडरच्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. 27 - दिल्लीतील ओखला येथील टाटा स्टील कंपनीजवळ सिलेंडरच्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत. काल रात्री ही घटना घडली. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.