Breaking News

आयुष्य झिजवणार्‍या बापाला तुम्ही काय कर्ज मुक्त करणार

दि. 01 जुलै - काल परवापासून एक पोस्ट सोशल मिडीयावर फिरते आहे.महाराष्ट्रातील शेतकर्यांचे कर्ज शेतकरी पुञ असलेल्या सरकारी कर्मचार्यांनीच फेडले.अशी  उपकाराची भाषा त्यात वापरली आहे.ही पोस्ट वाचल्यानंतर अनेक प्रश्‍न निर्माण होतात...एका बाजूला शेतकरी पुञ म्हणायचे आणि दुसर्या बाजूला बापाचे कर्जफेड  केल्याची उपकृताची शेखी मिरवायची? माञ ज्या एक दिवसाच्या पगाराचा हिशेब दिला जातोय तो पगार कुठून अन् कसा मिळतो? हा पगार मिळविण्याइतपत अंगी  पाञता यावी म्हणून बापाने सोसलेल्या वेदना साळसुदपणे हे दिवटे विसरतात.पितृऋणाचे हे पारणे असे फेडणार का...?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अन्नदाता शेतकरी चेष्टेचा विषय झाला आहे. शेतकरी कोण आहे, त्याचा त्याग कोणता आणि किती हे सांगण्यासाठी शेतकरी  माऊलीच्या पोटी जन्म घेऊन ढेकळात मुरावं लागत. शेतकरी त्यागाची समिक्षा करणे वातानुकुलीत कक्षात बसून तत्वज्ञानाच्या पुंगळ्या दाखवणार्‍या पुस्तकी पंडीतांच्या  बौध्दिक औकाती बाहेरचा खेळ आहे.
शेतकर्‍याला खरेतर कधीच कुणाच्या उपकाराची गरज नव्हती तो खाऊन पिऊन सुखी होता. मात्र राजकारणातील सत्तापिपासूंनी शेतकर्‍याला भिकारी केले. या कामात  सामान्य जनतेच्या करातून सार्‍या सुख सुविधा लाटणार्‍या प्रकाड पंडीतांनी त्यांना सोयीस्कर हातभार लावला. दुर्दैव म्हणजे या सत्तापिपासूंमध्ये आणि कर्जफेडीसाठी  एक दिवसाचा पगार दिल्याची शेखी मिरवून शेतकर्‍यांवर उपकार केल्याचा देखावा करणारे बहुसंख्येने शेतकरी पुत्र आहे. दिवट्या पुत्रांकडून हेच दिवस पहाणे बाकी  होते.
पोस्टकर्त्यांने शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा कसा उभा केला याचा त्याच्या कुवतीप्रमाणे हिशेब सादर केला आहे.त्याची भाषा बघाः शासकिय सेवेतील पुत्रच  धावले अखेर शेतकरी राजाच्या मदतीला...
महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांचे 34 हजार कोटीचे कर्ज माफ केले. परंतु कर्ज माफी शासनाने नाहीतर शेतकर्‍यांच्या पुत्रानेच केली. कारण कर्ज माफी करिता रक्कमची  व्यवस्था कोठुन करण्यात आली?
महाराष्ट्र शासनाने शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे कडुन माहे जुलै, 2017 च्या वेतनातुन एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे परिपत्रक  काढले.
सध्या महाराष्ट्रात एकूण 15,00,000 कर्मचारी आहेत. त्यांचा एका दिवसाचे सरासरी वेतन रू. 1000/-  आहे. आता गंमत पहा.
15,00,000 ु 1,000  = 1,50,00, 00000/- ( एक अब्ज, पन्नास कोटी ) कर्मचारी देणार आहे.
आता कुठल्याही राजकिय पक्षाने यांचे श्रेय घेवु नये.
कर्ज माफी ही शासकिय कर्मचार्यांनी केली आहे.
कृपया हा ारीीरसश सर्व ग्रुपवर षेीुरीव करण्यात यावा जेणे करून सर्व राजकीय पक्षापर्यंत पोहचेल.
काय म्हणायचं या मानसिकतेला? कर्जमाफी किती झाली..? तर चौतीस हजार कोटी. शासकीय कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा किती पगार जमा केला तर  मेसेजकर्त्याच्याच आकडेवारीनुसार एक अब्ज पन्नास कोटी. मग सांगा हा एवढा उपकार शेतकर्‍यांवर केला का? मुख्यमंत्री निधीवर उपकार केले असतील तुम्ही...  शेतकर्‍यांवर नाही. शेतकर्‍यांवर उपकार करण्याची पात्रता तरी आहे का तुमची.कुठे उदार मनाचा अन्नदाता अन् तुम्ही.
तुम्ही आज एक दिवसाचा पगार पगार मुख्यमंत्री निधीत जमा करून शेतकर्‍यांचे कर्ज फेडले असे म्हणता, तो पगार मिळविण्याची लायकी तुम्ही कुणामुळे प्राप्त केली  हो? बापाने कष्ट उपसून तुम्हाला शिकवलं, मोठं केलं, नोकरीला लावलं त्या बापामुळेच ना? वेळप्रसंगी हाच बाप उपाशी राहीला, पण शहरात शिकणार्‍या पोराचा  डबा पोहचवला. त्याच्या खानावळीचे बील रोकडा भरले. इतकेच नाही तुम्हाला नोकरीला लावतांनाही पुढार्‍यांची याचना केली. प्रसंगी आयुष्याच्या संध्याकाळसाठी  कामी येणारी पुंजीही तुम्हाला नोकरी लावतांना तुमच्यावर लावली, म्हणून तुम्ही आज एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीसाठी देण्यास पात्र झालात हे विसरू नका.  या बापाचे हे कर्ज तुम्ही कधीच फेडू शकत नाही.शेखी काय मिरवता? पायताण तर झिजलेच पण आयुष्यही खंगले तुम्हाला पगार मिळावा म्हणून. त्या शेतकरी  बापाला तुम्ही काय कर्ज मुक्त करणार? असले मेसेज व्हायरल करतांना मनाची तरी सांभाळा.